
पुणे - अंतीम वर्षाच्या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन १० दिवस उलटून गेले तरीही उच्च व तंत्र शिक्षण विभाग व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात याचा निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे विद्यापीठांकडे परीक्षेचा बी प्लान नव्हताच हे स्पष्ट झाले आहे. आता विद्यार्थ्यांना वेठीस न धरता सर्व विद्यापीठांसाठी एकच पद्धतीने परीक्षा घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
पुणे,औरंगाबाद आणि मुंबई सारखे विद्यापीठे फक्त एमसीक्यूला (बहुपर्यायी परीक्षा) पर्याय म्हणून पाहत आहेत. यातून विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे कामच सुरू आहे. विद्यार्थ्यांची मते ग्राह्य न धरता उदय सामंत आणि कुलगुरू पेडणेकर समिती जो निर्णय घेईल त्यात विद्यार्थ्यांच हित आहे असे जर समजत असाल तर ही आपली मोठी चूक आहे, अशी टीका मासूचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विद्यापीठांनी ऑनलाईन किंवा संकरीत पद्धतीने परीक्षा याव्यात, त्यामध्ये विद्यार्थ्यांना ई-मेल अथवा व्हॉट्सॲपद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली जाऊ शकते व विद्यार्थी ते दिलेल्या पद्धतीत त्या घर बसल्या सोडवू शकतील. १०० गुणांच्या पेपरचे विभाजन करताना ५० गुण बहुपर्यायी (एमसीक्यू) प्रश्नांना द्यावेत. त्यासाठी दीड तासाचा वेळ द्यावा. ३० गुण ओपन च्वाईस असेंसमेटं आणि २० गुण प्रात्यक्षिकांना द्यावेत. परीक्षोसाठी मार्च महिन्यापर्यंतचा पूर्ण झालेला अभ्यासक्रमच गृहीत धरावा.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी मासूने केली आहे. उच्च व तंत्र विभाग आणि विद्यापीठांनी एकत्रितपणे जनजागृती करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. उदय सामंत आणि विद्यापीठांचे कुलगुरु विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यात अपयशी झालेले असून फक्त विद्यार्थ्यांच्या संवेदनाशी खेळ करून त्यांचे भविष्य अंधारमय करीत आहे, अशी टीका इंगळे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.